आशिया चषक 2023 च्या तारखा आणि ठिकाणे अखेर जाहीर झाली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत कलहामुळे आशिया कपच्या तारखा आणि घोषणा रखडल्या होत्या. अखेर आज आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कपची घोषणा केली आहे.
आशिया कप 31 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळमध्ये होणार आहे.
आशिया कपसाठी हायब्रीड मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. उर्वरित सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जातील. हायब्रीड मॉडेल स्वीकारल्यानंतर भारत पाकिस्तानात जाणार नाही? हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया चषकाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. श्रीलंकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना होण्याची शक्यता आहे. आशिया चषक 2023 चा हंगाम दोन गटात खेळवला जाईल. दोन गटांतील प्रत्येकी दोन अव्वल संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. चारपैकी अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील.
आशिया कपमध्ये केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर टीम इंडियात पुनरागमन करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. या खेळाडूंच्या पुनरागमनामुळे निवड समितीच्या अडचणी वाढू शकतात.