बीसीसीआयचा बॅकअप प्लॅन,इंग्लंडविरुद्धचा सामन्यासाठी मयांकची निवड

मयांकची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली, तर त्याला कोणत्याही विलगीकरणात राहावे लागणार नाही
बीसीसीआयचा बॅकअप प्लॅन,इंग्लंडविरुद्धचा सामन्यासाठी मयांकची निवड

लिसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी रोहित शर्माने फलंदाजी केली; मात्र त्यानंतर त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. रोहित १ जुलैपर्यंत फीट होण्याची शक्यता असली तरी बीसीसीआयने ३१ वर्षांच्या मयांकला इंग्लंडला रवाना केले आहे. मयांकला इंग्लंडविरुद्धचा कसोटी संघ जाहीर झाला, त्यावेळी संघात स्थान मिळाले नव्हते; मात्र आधी के एल राहुलला झालेली गंभीर दुखापत आणि त्यानंतर रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मयांकची निवड झाली.

बीसीसीआयने माहिती दिली की, मयांक इंग्लंडसाठी रवाना होत आहे. तो रोहितचा बॅकअप म्हणून संघात असेल. गरज भासल्यास तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात देखील खेळेल. यूकेमध्ये सध्या कोरोनाविषयक खबरदारीचे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मयांकची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली, तर त्याला कोणत्याही विलगीकरणात राहावे लागणार नाही.

इंग्लंडमधील एकमेव कसोटी सामना हा गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेतील स्थगित झालेला पाचवा सामना आहे. त्यावेळी भारतीय संघात कोरोनाच उद्रेक झाल्याने पाचवा कसोटी सामना स्थगित करण्यात आला होता. आता हा कसोटी सामना आणि नंतर तीन टी-२० आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. गेल्या कसोटी मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in