इंग्लंडचा न्यूझीलंडला क्लीनस्वीप,सात गडी राखून विजय मिळविला

जो रुट (१२५ चेंडूंत नाबाद ८६), जॉनी बेअरस्टो (४४ चेंडूंत नाबाद ७१) आणि ओली पोप (१०८ चेंडूंत ८२) यांनी विजयात मोलाचे योगदान दिले
 इंग्लंडचा न्यूझीलंडला क्लीनस्वीप,सात गडी राखून विजय मिळविला

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी सोमवारी इंग्लंडने न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय मिळविला. इंग्लंडने मालिका ३-०ने जिंकून न्यूझीलंडला क्लीनस्वीप दिला.

विजयासाठीचे २९६ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ५४.३ षट्कांत तीन गडी बाद २९६ धावा करीत साध्य केले. जो रुट (१२५ चेंडूंत नाबाद ८६), जॉनी बेअरस्टो (४४ चेंडूंत नाबाद ७१) आणि ओली पोप (१०८ चेंडूंत ८२) यांनी विजयात मोलाचे योगदान दिले. प्रत्येक डावात पाच बळी टिपण्याची किमया करणाऱ्या जॅक लिचला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले, तर मालिकेत ३९६ धावा आणि एक विकेट अशी कामगिरी करणाऱ्या जो रूटला मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ३६० धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला ३१ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी २९६ धावांचे आव्हान मिळाले होते. दरम्यान, बेन फोक्सला कोरोना झाल्याचे निदान झाल्याने न्यूझीलंडच्या डावात ५२ व्या षट्कातील चार चेंडू झाल्यानंतर फोक्सच्या बदली सॅम बिलिग्सला बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in