
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि बाबर आझमच्या पाकिस्तान रविवार, ४ सप्टेंबर रोजी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता बळावली आहे.
२८ ऑगस्ट रोजी झालेल्या अ गटातील लढतीत भारताने पाकिस्तानवर पाच गाडी राखून मात केली. त्यामुळे आता पाकिस्तानला २ सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य आहे. पाकिस्तानने हाँगकाँगला नमवल्यास नियोजित वेळापत्रकानुसार ४ सप्टेंबर रोजी सुपर- फोरममध्ये अ- गटातील पहिला आणि दुसरा संघ आणि अमाने सामने येणार आहे.
त्यामुळे भारत पाकिस्तान लढतीची चाहात्यांना रविवारी पुन्हा मेजवानी मिळू शकते. त्यासाठी भारताने सुद्धा हाँगकाँगला नमवणे गरजेचे आहे. तसे झाल्यास भारत अ - गटात पहिल्या तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहील.
सुपर फोरमध्ये भारताला अफगाणिस्तानच्या कडव्या आव्हानाला सुद्धा सामोरे जावे लागेल.