वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची पाचव्या स्थानावर घसरण

दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचे ७८ गुण होते; मात्र पराभवानंतर त्याचे ७० गुण झाले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची पाचव्या स्थानावर घसरण

श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डावाने पराभव करून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये श्रीलंकेला १२ गुण मिळाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत श्रीलंका सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया नंबर वन वरून दुसऱ्या क्रमांकावर आली. श्रीलंकेच्या विजयामुळे भारताची पाचव्या स्थानावर घसरण झाली.

दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचे ७८ गुण होते; मात्र पराभवानंतर त्याचे ७० गुण झाले आहेत. चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच सामना गमावला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सहा सामने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णीत ठेवले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आला. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांपैकी पाच जिंकले, तर दोन सामने गमावले.

श्रीलंकेचा संघ ५४.१७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला. पाकिस्तानचे सात सामन्यांनंतर ५२.३८ गुण झाले असून, तो चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. सहा जिंकले, तर दोन गमावले आहेत. भारत ५२.०८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज ५० टक्के गुणांसह सहाव्या, इंग्लंड ३३.३३ टक्के गुणांसह सातव्या आणि न्यूझीलंड २५-९३ टक्के गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश संघ तळाला आहे. त्याचे १३.३३ टक्के गुण आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in