India vs Bangladesh Test series: भारताचा संघ जाहीर; पंतचे पुनरागमन, यश दयालला प्रथमच संधी

१९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने रविवारी भारतीय संघाची घोषणा केली.
India vs Bangladesh Test series: भारताचा संघ जाहीर; पंतचे पुनरागमन, यश दयालला प्रथमच संधी
Published on

नवी दिल्ली : १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने रविवारी भारतीय संघाची घोषणा केली. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे या संघात पुनरागमन झाले. कर्णधार रोहित शर्माच असेल, तर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांचा संघात समावेश करण्यात आला आहे. आकाश दीपला संघात स्थान देण्यात आले आहे. युवा वेगवान गोलंदाज यश दयालला प्रथमच संघात संधी मिळाली आहे.

बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल, असा भारतीय संघ असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला सामना चेन्नई येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यात भारतीय संघाने ११ वेळा विजय मिळवला आहे, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in