
भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. या मालिकेतील पहिला सामना हा एकही चेंडू ना खेळता पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसरा सामना हा भारताने जिंकला होता. त्यामुळे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. न्यूझीलंडने उभ्या केलेल्या १६१ धावांचा पाठलाग करताना भारताने 9 षटकांत 4 गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आला आणि खेळ थांबवला. त्यानंतर डीएलएस नुसार भारताचे लक्ष हे ७५ धावांचे येत होते. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताने ही मालिका १-० अशी खिशात घातली.
न्यूझीलंडने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी डेवॉन कॉन्वेने ५९ धावा आणि ग्लेन फिलिप्सने ५४ सर्वाधिक धावा केल्या. तर, भारताच्या अर्शदीप सिंग आणि सिराजने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेलनही एक विकेट घेतली. त्यांनतर १६१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली नाही. कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक ३० ताबडतोड धावा केल्या. भारताने ९ ओव्हरमध्ये ७५ धावा केल्या. त्यानंतर पाऊस आला आणि सामना थांबवला. अखेर काही वेळानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल काढण्यात आला आणि सामना बरोबरीत सुटला.