
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दिल्लीत सुरू असलेला कसोटी सामना भारताने जिंकला. बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील दुसरा सामना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून जिंकला आहे. दिल्ली कसोटी जिंकून भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय आहे. कारण गेल्या 63 वर्षांपासून कांगारू टीम इंडियाला दिल्लीत पराभूत करू शकलेले नाहीत. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन गोलंदाजांनी दिल्ली कसोटीत चमकदार कामगिरी केली आहे. या दोघांच्या फिरकी जादूने ऑस्ट्रेलियन संघ थक्क झाला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर रोखला. या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 42 धावांत 7 बळी घेतले. अश्विनने 59 धावांत 3 बळी घेतले.