वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ५ टी २० सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड ; 'या' दिग्गज खेळाडूंना देण्यात आला आराम

हार्दिक पांड्यावर भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे
वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ५ टी २० सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड ; 'या' दिग्गज खेळाडूंना देण्यात आला आराम
Published on

वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. हार्दिक पांड्यावर भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर सुर्यकुमार यादव याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय निवड समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संघाची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय संघाची निवड करताना रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. तर यशस्वी जायस्वाल, तिलक वर्मा, आवेश खान, मुकेश कुमार यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तर अर्शदीप सिंह, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे.

भारतीय वेळेनुसार, कसोटी सामने हे संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय सामन्यांना सात वाजता सुरुवात होणार आहे. टी २० सामन्यांना रात्री आठ वाजता सुरुवात होणार आहे.

पाच टी २०, २ वनडे आणि २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला असून १२ जूलै पासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघात सिनीयर खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. टी २० संघात मात्र वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in