भारतीय महिला खेळाडू शरीरसौष्ठव खेळासाठी सज्ज

शरीरसौष्ठवाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने महिला खेळाडू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे
भारतीय महिला खेळाडू शरीरसौष्ठव खेळासाठी सज्ज

शरीरसौष्ठव खेळ हा पुरूषप्रधान आहे, ही समजूत खोडून काढण्यासाठी भारतीय महिला खेळाडू सज्ज झाल्या आहेत. आजपासून म्हणजेच १५ ते २१ जुलैदरम्यान मालदीवमध्ये रंगणाऱ्या ५४व्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत भारताने ८१ पैलवानांचा चमू धाडला असून यामध्ये १९ महिलांचाही समावेश आहे.

शरीरसौष्ठवाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने महिला खेळाडू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चूल-मुल सांभाळणाऱ्या महिला आता पावरफुल झाल्या आहेत, असा विश्वास भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी व्यक्त केला. गेली तीन वर्षे शरीरसौष्ठवाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सोनं जिंकणारी हरयाणाची गीता सैनी यावेळी पदकाची प्रबळ दावेदार आहे. त्याशिवाय १५ वर्षीय मुलाची आई मुंबईकर डॉ. मंजिरी भावसारकडूनही पदकाच्या अपेक्षा आहेत. ५५ वर्षीय निशरीन पारीख या स्पर्धेच्या मुख्य आकर्षण ठरत आहेत. ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील अशा दोन गटांत ही स्पर्धा रंगणार असून यामध्ये मॉडेल फिजिक, स्पोर्ट्स फिजिक, अॅथलेटिक फिजिक आणि मॉडेल फिजिक (३० वर्षांवरील) असे चार प्रकार पडतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in