बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुवर्णपदकांची हॅट‌्ट्रिक ; पुरुष दुहेरीतही जिंकले सुवर्णपदक

पहिल्या गेममध्ये इंग्लंडच्या लॅन आणि वेंडी जोडीने सुरुवातीला सात्विक आणि चिराग यांना तोडीस तोड जबाब दिला
बॅडमिंटनमध्ये  भारताच्या सुवर्णपदकांची हॅट‌्ट्रिक ; पुरुष दुहेरीतही जिंकले सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी भारताने बॅडमिंटन पुरुष दुहेरीत इंग्लंडचा २१-१५, २१-१३ असा पराभव करत भारताला बॅडमिंटनमधील तिसरे सुवर्णपदक मिळविले. बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुवर्णपदकांची हॅट‌्ट्रिक झाली. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने इंग्लंडच्या बेन लॅन आणि सिअन वेंडीचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

सात्विक आणि चिरागने पहिल्या गेममध्ये २१-१५ ने विजय मिळविला. पहिल्या गेममध्ये इंग्लंडच्या लॅन आणि वेंडी जोडीने सुरुवातीला सात्विक आणि चिराग यांना तोडीस तोड जबाब दिला. सामना अटीतटीचा झाला. पहिल्या गेमच्या दुसऱ्या हाफमध्ये चिराग आणि सात्विक यांनी आघाडी घेत पहिला गेम २१-१५ ने काबीज केला.

दुसऱ्या गेममध्ये यजमान इंग्लंडच्या जोडीने शानदार सुरुवात केली; मात्र भारताने ३-२ अशी एका गुणांची आघाडी मिळविली. भारतीय जोडीने ही आघाडी दुसऱ्या गेमच्या मध्यापर्यंत ११-१० अशी ठेवली.

दुसऱ्या गेमच्या दुसऱ्या हाफमध्ये भारतीय जोडीने जोरदार खेळ करत आघाडी १७-११ अशी वाढवून वर्चस्व मिळविले. त्यानंतर चिराग आणि सात्विक यांनी इंग्लंडच्या लॅन आणि वेंडी यांच्याविरुद्ध दुसरा गेमदेखील २१-१३ने जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in