इंग्लंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात भारताची दमदार कामगीरी

बेअरस्टोच्या या शतकामुळे इंग्लंडने फॉलोऑनही वाचविता आला.
इंग्लंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात भारताची दमदार कामगीरी

इंग्लंडविरुध्दच्या पुनर्नियोजित पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळविली आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा भारताने दुसऱ्या डावात २ गडी बाद ७३ धावा केल्या होत्या. भारताची एकूण आघाडी त्यावेळी २०५ धावांची झाली होती. शुभमन गिल (३ चेंडूंत ४) आणि हनुमा विहारी (४४ चेंडूंत ११) हे बाद झाले. त्यांना अनुक्रमे जेम्स ॲन्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी बाद केले. इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टोने झळकविलेल्या शतकाच्या (१४० चेंडूंत १०६) जोरावर यजमानांना समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले. त्याचबरोबर बेअरस्टोच्या या शतकामुळे इंग्लंडने फॉलोऑनही वाचविता आला. यजमानांचा पहिला ६१.३ षटकांत २८४ धावांत सपुष्टात आला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ४१६ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी मिळाली. मोहम्मद सिराजने चार बळी मिळविले. कर्णधार जसप्रीत बुमराहने तीन विकेट्स मिळविल्या. मोहम्मद शमीने दोन बळी टिपले. शार्दुल ठाकूरने एक फलंदाज बाद केला. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या ‌खेळावरही पावसामुळे व्यत्यय आला.

तिसऱ्या दिवशी सुरुवातीला हवामान खेळाला पोषक होते. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत सहा गडी गमावून दोनशे धावा केल्या होत्या. इंग्लंडचे शतक ३२ व्या षटकात फलकावर झळकले. जॉनी बेअरस्टोने ८१ चेंडूत अर्धशतक झळकविले. त्याने मोहम्मद सिराजच्या ३७ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक धावा घेत ५० धावा पूर्ण केल्या. इंग्लंडने ३७ षटकात ५ विकेट्स गमावून१४८ धावा केल्या. अडतिसाव्या षटकात शार्दुल ठाकूरने कर्णधार बेन स्टोक्सला बुमराहच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. बेन स्टोक्स ३६ चेंडूंत २५ धावा करून बाद झाला. इंग्लंडची धावसंख्या त्यामुळे ६ बाद १४९ अशी झाली.

४६ व्या षटकातील तिसरा चेंडू टाकून झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी इंग्लंडच्या पहिल्या डावात षटकात ६ बाद २०० धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा जॉनी बेअरस्टो ९१ आणि सॅम बिलिंग्ज ७ धावांवर खेळत होते.

पाऊस थांबल्यानंतर शार्दुलने त्याचे अपूर्ण राहिलेले षटक पूर्ण केले. जॉनी बेअरस्टो आणि सॅम बिलिंग्स यांनी पूर्ववत एकाग्रता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बेअरस्टोने ११९ चेंडूत १४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

शतकवीर बेअरस्टो ५५ व्या षटकात बाद झाला. शमीच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल कोहलीने टिपला. बेअरस्टोने एकूण १४० चेंडूंना सामोरे जात १४ चौकार आणि दोन षटकार लगावत १०६ धावा केल्या. शार्दुलच्या षटकात बेअरस्टोने १ चौकार आणि १ षटकार लगावत एकूण ११ धावा वसूल केल्या होत्या.

स्टुअर्ट ब्रॉडला (५ चेंडूंत १) फार काही करता आले नाही. सॅम बिलिंग्सने (५७ चेंडूंत ३६) संघाला उपयुक्त खेळी केली. मॅथ्यू पॉट्सने (१८ चेंडूंत १९) धावसं‌ख्या वाढविण्यावर भर देताना एक षटकार आणि तीन चौकार लगावले. त्याला सिराजने अय्यरकडे झेल देण्यास भाग पाडून यजमानांचा पहिला डाव संपुष्टात आणला. जेम्स ॲन्डरसन (१० चेंडूंत ६) नाबाद राहिला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी ५ बाद ८४ धावा केल्या होत्या. कर्णधार बेन स्टोक्स शून्यावर, तर जॉनी बेअरस्टो १२ धावांवर नाबाद होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in