भारताच्या 'या' वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला अलविदा

प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडला क्लीन स्वीप देरून झुलनला संस्मरणीय निरोप देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला.
 भारताच्या 'या' वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला अलविदा

लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने क्रिकेटला अलविदा केले. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हा तिचा शेवटचा सामना ठरला. टीम इंडियाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतल्याने भारताला हॅट‌्ट्रिकची नामी संधी होती. प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडला क्लीन स्वीप देरून झुलनला संस्मरणीय निरोप देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स‌वर किमान एक सामना खेळणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते; पण कारकीर्दीतील शेवटचा सामना येथे खेळण्याचे भाग्य झुलनला मिळाले. झुलनसोबत सुमारे २० वर्षे खेळलेली मिताली राजही मैदानात निवृत्ती जाहीर करू शकली नाही. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि ग्लेन मॅकग्रा या महान पुरुष क्रिकेटपटूंनाही लॉर्ड्सवर कारकीर्दीतील शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in