चेन्नईचे नेतृत्व पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे करणार

आयपीएलच्या पुढील हंगामातही माही खेळताना दिसणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे
चेन्नईचे नेतृत्व पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे करणार

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करणार आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ही माहिती दिली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामातही माही खेळताना दिसणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

आयपीएल २०२२च्या हंगामात नव्याने पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्स या संघाने जेतेपद पटकाविले. त्यानंतर सर्व फ्रेंचायझी आतापासूनच आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कामाला लागले आहेत. आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. ‘इनसाईड स्पोर्ट’ या संकेतस्थळाने याबाबत माहिती दिली की, आयपीएल २०२३ हंगामामध्ये सीएसके संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करणार असल्याच्या माहितीला सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दुजोरा दिला. “आम्ही आमच्या भूमिकांमध्ये कोणताही बदल केलेला नाही,” असे विश्वनाथन यांनी संघाच्या कर्णधारपदाविषयी सांगितल्याचे संकेतस्थळाने नमूद केले आहे. आयपीएल २०२१ मधील हंगामात सीएसके संघामध्ये अनेक उलथापालथी झाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in