पाकिस्तानचा कर्णधारा बाबर आझमने विराट कोहलीचा विक्रम मोडला?

पाकिस्तानचा कर्णधारा बाबर आझमने विराट कोहलीचा विक्रम मोडला?

पाकिस्तानने हा सामना पाच गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधारा बाबर आझमने वन-डे सामन्यांतील सलग तिसरे शतक झळकावून पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना विराट कोहलीच्या नावे असलेला एक विक्रम आपल्या नावे केला. दरम्यान, पाकिस्तानने हा सामना पाच गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. विजयासाठीचे ३०५ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने ४९.२ षट्कांत पाच गडी बाद ३०६ धावा करीत साध्य केले. २३ चेंडूत नाबाद ४१ धावा करणाऱ्या खुशदिल शाहला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

कर्णधार म्हणून कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करण्याचा विश्वविक्रम केला होता. २०१७ मध्ये विराटने १७ एकदिवसीय डावात एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र, बाबर आझमने कर्णधार म्हणून केवळ १३ डावांत हजार धावांचा करून विराटचा विक्रम मोडला. असा चमत्कार करणारा पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला.बुधवारी मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर बाबरला कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी ९८ धावांची गरज होती आणि त्याच्याकडे चार डावांची संधी होती. मात्र, पहिल्याच एकदिवसीय सामन्यात आझमने कोहलीला मागे टाकले. पाकिस्तानचा एकदिवसीय कर्णधार म्हणून १३ डावांमध्ये या २७ वर्षीय खेळाडूने ९१.३६ च्या सरासरीने आणि १०३. ७१ च्या स्ट्राइक रेटने सहा शतके आणि तीन अर्धशतकांसह १००५ धावा केल्या आहेत. शतकी खेळीसह बाबर आजमने इतिहास रचत वन-डे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. वेस्ट इंडिजपूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग शतके झळकावली होती. त्याच वेळी त्याने २०१६ मध्ये कॅरेबियन संघाविरुद्ध तीन वेळा सलग १०० हून अधिक धावा करताना शतकांची हॅट‌्ट्रिक केली होती.

सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील पाकिस्तानी संघाची धुरा बाबर आझमच्या हाती देण्यात आलेली आहे. बाबर आझमदेखील कर्णधारपदाच्या लौकिकाला साजेसा खेळ करत आहे. बाबर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बाबरने १०७ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. त्याचे हे सलग तिसरे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक ठरले.्.

तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनदा सलग तीन शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. बाबर आझमची तुलना नेहमीच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी केली जाते. विराट सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. याउलट बाबर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे शतक ठोकले होते. म्हणजेच गेल्या ३१ महिन्यांपासून त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एकही शतक करू शकलेला नाही. याच काळात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ११ शतके झळकाविली आहेत. त्यामध्ये चार कसोटी, सहा एकदिवसीय आणि एका टी-२० शतकाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in