खेळाडूंना श्रीमंत लीगमध्ये खेळण्यास मोकळीक व्यवहार्यच; सुनील गावसकर यांचे रोखठोक मत

गावसकर यांनी लिहिले की, 'आयपीएलला आयसीसीच्या कॅलेंडरमध्ये ७५ दिवसांची विंडो मिळाली आहे.
खेळाडूंना श्रीमंत लीगमध्ये खेळण्यास मोकळीक व्यवहार्यच; सुनील गावसकर यांचे रोखठोक मत

'दक्षिण आफ्रिका टी-२० लीग आणि युएई टी-२० लीगच्या बातमी प्रसिध्द झाल्यानंतर आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होत असल्याचा तर्क हास्यास्पद आहे, असे रोखठोक मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्सस्टारमध्ये लिहिलेल्या आपल्या स्तंभात व्यक्त केले.

गावसकर यांनी लिहिले की, 'आयपीएलला आयसीसीच्या कॅलेंडरमध्ये ७५ दिवसांची विंडो मिळाली आहे. क्रिकेट प्रशासकांनी भविष्याचा वेध घेतल्यामुळे हे शक्य झाले आहे. खेळाडूंना काही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यास भाग पाडण्यापेक्षा जगातील सर्वात श्रीमंत लीगमध्ये खेळू द्यावे, हे त्यांना कळून चुकले आहे.'

गावसकर यांनी क्रिकेटमधील जुन्या कथित महाशक्तींनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, 'एमसीसी प्रेसिडेंट्स बॉक्समध्ये प्रतिष्ठितांना आमंत्रित करून क्रिकेटचा क्रिकेटचा विस्तार होणार नाही, हे काही क्रिकेट बोर्डांना अखेर उमगले आहे. नव्या प्रशासकांना कोणताही कमीपणाचा न्यूनगंड नाही. त्यांनी प्रत्येक चार वर्षाच्या अंतराने भारतात येऊन क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली आहे. आता त्या जुन्या महाशक्तींना भारताने त्यांच्या देशात प्रत्येक वर्षी खेळण्यास यावे असे वाटते. कारण ज्यावेळी भारतीय संघ त्यांच्याविरूद्ध खेळतो त्यावेळी त्यांच्या गल्ल्यात अधिक पैसे जमा होतात. तेव्हा या प्रवृटींनी क्रिकेटमधील स्वार्थ पाहावा; मात्र कृपा करून आमच्या घरात डोकावून आम्हाला काय करायचं हे शिकवू नये. आम्हाला आमचे हित समजते.'

आयपीएलला आयसीसीच्या २०२४ च्या फ्युचर टूर प्लॅनिंगमध्ये अडीच महिन्यांची विंडो मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये टी-२० फ्रँचायझी क्रिकेटचा वाढता प्रभाव अधोरेखित होत आहे. याचबरोबर आयपीएलमधील फ्रँचायझींनी जगभरातील इतर टी-२० लीगमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. यात युएई आणि साऊथ आफ्रिका टी-२० लीग यांचा देखील समावेश आहे.

गिलख्रिस्टला जबरदस्त उत्तर

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीग न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आले. तो बिग बॅशच्या ऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी-२० लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे. तेथे त्याला अधिक पैसा मिळण्याची आशा आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने टीका केली होती. गिलख्रिस्टने जागतिक पातळीवर आयपीएल कसे वर्चस्व गाजवत याबाबत देखील आपले मत व्यक्त केले होते. गिलख्रिस्टला गावसकर यांनी जबरदस्त उत्तर दिले. गिलख्रिस्ट एका रेडिओ शो मध्ये म्हणाला होता की, ' डेव्हिड वॉर्नरला बीबीएलमध्ये खेळण्यासाठी सक्ती करता येणार नाही; मात्र त्याला जाऊ देणे किंवा दुसऱ्या खेळाडूला जाऊ देणे हा सर्व आयपीएल फ्रँचायझींच्या जागतिक पातळीवरच्या वर्चस्वाचा भाग आहे. यात वॉर्नरला एकट्या दोष देता कामा नये. कारण अनेक खेळाडू त्यांच्या रडारवर असणार आहेत. आयपीएल फ्रँचायझींनी कॅरेबियन प्रीमियर लीगमधील संघ विकत घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरूवात केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in