रोहित शर्माने बाबर आझमला दिला लग्नाचा सल्ला

याबाबतचा एक व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे
रोहित शर्माने बाबर आझमला दिला लग्नाचा सल्ला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकमेकांना भेटले, तेव्हा रोहितने बाबरला चक्क लग्नाचा सल्ला दिला. याबाबतचा एक व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. याआधी विराट कोहली बाबर आझमला भेटतानाचा व्हिडीओही प्रसारित झाला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमध्ये दोन्ही कर्णधारांवरही दडपण असते; पण भारताचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्याकडे इतर सामन्यांप्रमाणेच पाहिले. सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा आणि आझम बोलताना दिसले. या दोघांमधील संभाषणाच्या व्हिडीओत रोहित बाबरला म्हणतो की, ‘‘भाऊ, लग्न कर’’ यावर बाबर हसून म्हणतो की, “नाही, आता नाही.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in