षट्कांची योग्य गती राखण्यासाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाजांनची निवड समिती

भारताने संघ निवडताना युझवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या तीन फिरकीपटूंना पसंती दिली आहे
षट्कांची योग्य गती राखण्यासाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाजांनची निवड समिती

येत्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत षट्कांची योग्य गती राखण्यासाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाजांना निवड समितीने प्राधान्य दिले आहे. कर्णधार रोहित शर्माशी सल्लामसलत करून निवड समितीने खास रणनीतीचा हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

भारताने संघ निवडताना युझवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या तीन फिरकीपटूंना पसंती दिली आहे. त्याचबरोबर दीपक हुडाही प्रसंगी फिरकी गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. फिरकी गोलंदाजी करताना कमी वेळ लागतो. त्यामुळे संघात किमान दोन फिरकीपटू आणि एक अष्टपैलू असलेला फिरकीपटू असल्यास संघाला बराच वेळ वाचविता येऊ शकतो, असा हेतू निवड समितीने बाळगल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या संघात चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे.

कोणत्याही देशाचा संघ हा निवड समिती निश्चित करीत असली, तरी त्यात कर्णधाराची भूमिकाही महत्त्वपूर्ण असते. कर्णधार हा मैदानात व्यूहरचना आखत असल्योन मैदानात येणाऱ्या समस्यांवर उपायही त्याला शोधावे लागतात. त्यामुळे जर कर्णधाराने एखादी शिफारस केल्यास निवड समितीला त्यावर विचार करावा लागतो. त्यामुळे चार फिरकीपटूंची निवड कर्णधार रोहितच्या सल्ल्याने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आशिया चषकातील भारताच्या निराशाजनक कामगिरीला तांत्रिक बाबीही कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. संथ गोलंदाजीचा फटका भारतीय संघाला बसला. षट्कांच्या संथ गतीमुळे अखेरच्या काही षट्कांमध्ये फक्त चारच खेळाडू भारतीय संघाला सीमारेषेजवळ ठेवता आले.

पाच क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये ठेवावे लागले. त्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोठी फटकेबाजी करणे सोपे झाले. त्यामुळे अखेरच्या षट्कांमध्ये प्रतिस्पर्धी संघांनी जास्तीत जास्त धावा केल्या आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in