शेवटच्या षट्काच्या शेवटच्या चेंडूवर अजब नाट्य

शेवटच्या षट्काच्या शेवटच्या चेंडूवर अजब नाट्य

इंिडन गार्डन्सवर आयपीएल २०२२च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानच्या डावातील शेवटच्या षट्काच्या शेवटच्या चेंडूवर अजब नाट्य पाहायला मिळाले.

२०व्या षट्कातील शेवटचा चेंडू यश दयालने नो बॉल टाकला. त्या चेंडू जोस बटलर धावबाद झाला. फ्री हिट चेंडू असला, तरी फलंदाज धावबाद असतो. त्यामुळे बटलर बाहेर गेला. पुढचा चेंडू खेळण्यासाठी अश्विन आला, तेव्हा यशने चेंडू वाइड टाकला. अश्विन आणि रियान पराग यांच्यात गोंधळ उडून पराग धावबाद झाला. राजस्थानने एकही चेंडू न खेळता दोन गडी गमावले. यश दयालने अखेर नीट चेंडू टाकला आणि अश्विनने त्यावर धावा काढल्या. राजस्थानची धावसंख्या मग ६ बाद १८८ झाली. या २०व्या षट्काच्या सहाव्या चेंडूवर गुजरातने दोन विकेट्स घेतल्या आणि पाच धावा दिल्या. बटलर धावबाद झाला तेव्हा तो चेंडू नो बॉल होता आणि एक धाव त्याने पळत पूर्ण केली होती. अशा दोन धावा झाल्या. पुढचा चेंडू यशने वाइड टाकला आणि तीन धावा झाल्या. त्यानंतर अश्विनने शेवटच्या चेंडूवर दोन धावा केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in