टीम इंडियाची घरची दारे सुमारे चार महिने बंद

सहा देशांचा दौरा करणार असून त्याची सुरुवात आयर्लंडपासून होणार आहे
टीम इंडियाची घरची दारे सुमारे चार महिने बंद

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेनंतर टीम इंडियाचा परदेश दौरा सुरु होणार असल्याने क्रिकेटपटूंसाठी घरची दारे बंद असणार आहेत. त्यांना सुमारे चार महिने घरी परतता येणार नाही. टीम इंडिया पुढील चार ते पाच महिन्यांत एकूण सहा देशांचा दौरा करणार असून त्याची सुरुवात आयर्लंडपासून होणार आहे. यादरम्यान संघाला दोन घरच्या मालिकाही खेळायच्या आहेत.

भारताचा परदेश दौरा या महिन्यात २६ जूनपासून सुरू होईल. आयर्लंडमध्ये भारत दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २८ जून रोजी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी कोरोनामुळे स्थगित झालेल्या एका कसोटी सामन्यासह तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयर्लंडनंतर टीम इंडिया इंग्लंडला जाणार आहे. इंग्लंडमध्ये भारताला गेल्या वर्षी कोविड-१९ मुळे स्थगित झालेली एक कसोटी सामन्याव्यतिरिक्त तीन एकदिवसीय आणि तितक्या टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

दोन्ही संघांमधील हा दौरा १ ते १७ जुलै दरम्यान होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ कसोटी सामन्यासाठी याआधीच इंग्लंडला पोहोचला आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि चेतेश्वर पुजारा या खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. तेथे २२ जुलै पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. उभय संघांमधील तीन एकदिवसीय मालिकेव्यतिरिक्त पाच टी-२० सामने देखील खेळवले जाणार आहेत. विंडीज संघाविरुद्ध काही सामने अमेरिकेत देखील खेळले जाणार आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला श्रीलंका दौऱ्यावर जावे लागणार आहे.

भारतीय संघ श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० आशिया चषक स्पर्धेत सहभागी होईल. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन सप्टेंबरमध्ये होणार आहे. टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचा बांगलादेश दौरा नियोजित करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये भारतीय संघ दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in