एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत या खेळाडुने पटकाविले सुवर्णपदक

सुवर्णपदकाला गवसणी घालत कजाकिस्तानमध्ये या एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला
 एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत या खेळाडुने  पटकाविले सुवर्णपदक

कजाकिस्थान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात येथील सावरकरनगर जिमखान्याचा कुस्तीवीर शुभम आचपळे याने सुवर्णपदक पटकाविले. या विजयाबद्दल शुभमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कजाकिस्तान येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा योग मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखाना कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू कुस्तीपटू शुभम हरी अचपळे याला आला. शुभमने ४८ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घालत कजाकिस्तानमध्ये या एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. शुभमला प्रशिक्षक, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

शुभम चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. सतत सराव, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर यश मिळवल्याचा मनोदय गिडगे यांनी व्यक्त केला आहे. घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही वडील हरिभाऊ अचपळे व आई मंदाकिनी यांनी शुभमला घरातून कुस्तीसाठी प्रोत्साहित केले. शुभमचे गुरुवर्य साईनाथ गिडगे यांनी शुभमला व त्याच्या लहान भावाला वयाच्या सहाव्या वर्षी दत्तक घेतले. त्यानंतर शुभमने साईनाथ गिडगे यांच्या तालमीत कुस्तीचे धडे गिरविले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in