भारतापुढे वेस्ट इंडिजचे आव्हान;भारतीय संघ विजयाचे सातत्य राखणार का, याबाबत औत्सुक्य

२०-२० सामन्यांसाठी भारताचे नेतृत्व हे रोहित शर्मा करणार आहे.
 भारतापुढे वेस्ट इंडिजचे आव्हान;भारतीय संघ  विजयाचे सातत्य राखणार का, याबाबत औत्सुक्य

इंग्लंडवर दणदणीत विजय साकारल्यावर आता भारतापुढे वेस्ट इंडिजचे आव्हान असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन वन-डे आणि पाच २०-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात २२ जुलै रोजी वन-डे मालिकेने होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आपल्या विजयाचे सातत्य कायम राखतो का, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

या मालिकेसाठी दोन वेगवेगळे संघ तयार करण्यात आले आहेत. वन-डे संघाचे नेतृत्व यावेळी शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे, तर २०-२० सामन्यांसाठी भारताचे नेतृत्व हे रोहित शर्मा करणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यातील अखेरच्या दोन लढती अमेरिकेत खेळणार आहे. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी होणारी चौथी आणि पाचवी टी-२० लढत अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे. त्यामुळे या सामन्याच्या वेळा मात्र वेगवेगळ्या असणार आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन वन-डे सामने २२, २४ आणि २७ जुलै या कालावधीमध्ये होणार आहेत. हे तिन्ही सामने पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवण्यात येणार आहेत. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरू होणार आहेत.

त्यानंतर पाच २०-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २९ जुलैला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतरचे दोन सामने हे १ आणि २ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहेत. हे तिन्ही सामने रात्री ८.०० वाजता सुरू होणार आहेत. या मालिकेतील शेवटचे दोन्ही सामने हे अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. हे सामने ७ आणि ८ ऑगस्ट रोजी नियोजित आहेत. हे दोन्ही सामने रात्री ८.०० वाजता सुरू होणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in