आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्न भंगले

या संघात युवा फलंदाज इशान किशन, व्यंकटेश अय्यर, यष्टिरक्षक संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही
आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्न भंगले

संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाची घोषणा केली असून आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्नही भंगले आहे.

या संघात युवा फलंदाज इशान किशन, व्यंकटेश अय्यर, यष्टिरक्षक संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. याशिवाय अष्टपैलू शार्दूल ठाकूर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांनाही संघात स्थान मिळू शकलेले नाही. नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडेच सोपविली आहे. सध्या बॅड पॅचमध्ये असलेल्या विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. स्टार फलंदाज के एल राहुलचेही या १५ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे राहुल बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया चषक स्पर्धेला मुकणार आहे. तो पाठीच्या दुखण्यातून सावरला नसल्याने आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in