पैलवानांच्या आंदोलनाचा विषय सरकार काळजीपूर्वक हाताळत आहे - केंद्रीय क्रिडा मंत्री

ते म्हणाले की सरकारने पैलवानांची आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी स्विकारली
पैलवानांच्या आंदोलनाचा विषय सरकार काळजीपूर्वक हाताळत आहे - केंद्रीय क्रिडा मंत्री

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरनसिंग यांना लैगिक छळणूक प्रकरणी अटकेच्या मागणीसाठी आंदेालन करीत असलेल्या पैलवानांचा विषय केंद्र सरकार नाजुकपणे व अत्यंत काळजीपूर्वक हाताळत आहे अशी माहिती केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी मुंबईत बेालतांना दिली.

अनुराग ठाकूर गुरुवारी मुंबईत आले हेाते. ते म्हणाले की सरकारने पैलवानांची आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी स्विकारली असून तपास प्रक्रिया सध्या सुरु आहे. ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धांचे पदक विजेते साक्षी मलिक, विनेश फेागाट, बजरंग पुनिया, आणि संगीता फेागट यासारखे पैलवान भाजपचे खासदार आणि माजी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सरन सिंग यांना अटक हेाणयासाठी आंदेालन करीत आहेत. ब्रिजभूषण यांनी महिला पैलवानांचे लैगिक शेाषण केले असा आरेाप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पैलवानांनी याबाबत एफआयआर नेांदवून घेण्याची मागणी केली हेाती ती पूर्ण करण्यात आली आहे. तेव्हा पैलवानांनी केाणतेही आततायी पाउल न उचलता धीर धरावा, येाग्य ती कारवार्इ केली जार्इल, असे ठाकूर यांनी पैलवानाना सांगितले आहे. तसेच सर्वेाच्च न्यायालयाने पैलवानांना प्रथम दंडाधिकारी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

पैलवानांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांची पंजाब, हरयाणात निदर्शने

संयुक्त किसान मेार्चाच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी आंदेालनकारी पैलवानांना पाठिंबा देतांना पंजाब आणि हरयाणात निदर्शने केली आहेत. शेतकऱ्यांनी आपली निवेदने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिली असून त्यात कुस्तीमहासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच संयुक्त किसन मेार्चाने पैलवानांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. तसेच संयुक्त किसान मेार्चाने राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर केले असून त्यात जंतर मंतर पैलवानांना निदर्शनासाठी उपलब्ध करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी विनवणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in