भारतीय क्रिकेट संघाकडून आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्याची तयारी सुरू

भारतीय संघ शुक्रवार, २२ जुलै रोजी वेस्ट इंडिज दौऱ्यावर वन-डे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे
भारतीय क्रिकेट संघाकडून आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्याची तयारी सुरू

टी-२० आणि वन-डे मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने आता वेस्ट इंडिज दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाला यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय संघ शुक्रवार, २२ जुलै रोजी वेस्ट इंडिज दौऱ्यावर वन-डे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला विंडीज दौऱ्यावर जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था केली आहे. भारतीय संघ मंगळवारी एकदिवसीय मालिकेसाठी रवाना होणार आहे.

संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला वन-डे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. भारताने एकदिवसीय मालिकेसाठी १६ जणांचा संघ निवडण्यात आला आहे. या संघात संजू सॅमसन, सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेचा भाग नव्हते. क्वीन्स पार्क ओव्हलवर वेस्ट इंडिज २२, २४ आणि २७ जुलै रोजी भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर पाच टी-२० सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत. खराब फॉर्मशी झुंजत असलेला विराट कोहलीला विंडीज दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आता आशिया कपदरम्यान भारतीय संघात सामील होणार असून आशिया कप २७ ऑगस्टपासून होणार आहे. सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर कोहलीला पाच डावांत २० धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून तीन वर्षे झाली आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in