भारतीय संघापुढे आता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेचे आव्हान उभे ठाकणार

कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना लवकरच सर्वोत्तम संघ निवडावा लागणार आहे
भारतीय संघापुढे आता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेचे आव्हान उभे ठाकणार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघापुढे अाता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांचे आव्हान उभे ठाकणार आहे. भारतीय संघाकडे टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी अवघे काही सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना लवकरच सर्वोत्तम संघ निवडावा लागणार आहे. भारतीय संघ अनेक महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.

टी-२० विश्वचषकापूर्वी भारतात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका होणार आहे. भारतीय संघाने अद्याप ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका मालिका किंवा टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर केलेला नाही; मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत ज्या खेळाडूंना संघात स्थान मिळेल तेच खेळाडू टी-२० विश्वचषक खेळतील, असे मानले जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in