स्ट्रेचर ते सिक्सर हा प्रवासच अतिशय सुंदर; विजयानंतर हार्दिक पंड्याचे मनोगत

आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळताना मला स्ट्रेचरवरून याच मैदानातून बाहेर नेण्यात आले होते.
स्ट्रेचर ते सिक्सर हा प्रवासच अतिशय सुंदर; विजयानंतर हार्दिक पंड्याचे मनोगत

स्ट्रेचर ते सिक्सर हा प्रवासच अतिशय सुंदर झाला. २०१८ मध्ये आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात याच मैदानातून मला स्ट्रेचरवरून बाहेर जावे लागले होते. भूतकाळात घडलेल्या अशा घटनांतून पुढे जाताना प्रयत्नांना फळ मिळाल्याचे समाधान मिळते. मला ती संधी मिळाली, अशा शब्दात विजयी षट्कार मारून भारताला विजय मिळवून देणारा सामनावीर हार्दिक पंड्याने व्यक्त केले.

सामना जिंकल्यानंतर अष्टपैलू हार्दिक म्हणाला की, “मला तो दिवस आजही आठवतो. २०१८ च्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळताना मला स्ट्रेचरवरून याच मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. भूतकाळात घडलेल्या अशा घटनांतून पुढे जाताना काहीतरी विशेष केल्याचे समाधान मिळते. आपल्या मेहनतीची फळे आपल्यालाच मिळतात.

अर्थात त्यामागे अनेकांचीही मेहनत असते, त्यांना श्रेय मिळाले पाहिजे”. हार्दिक म्हणाला की, “शेवटच्या षट्कात सात धावांची आवश्यता होती. सात धावा काढणे खूप मोठे आव्हान नव्हते. यावेळी दहाच्या दहाही खेळाडून सीमारेषेवर ठेवले असते, तरी मला काही फरक पडला नसता. मला एक मोठा फटका मारायचा होता. माझ्यावर कोणताच दबाव नव्हता.

दबाव हा गोलंदाजावर होता, हे मी ओळखून होतो. त्यामुळे तो चेंडू कसा टाकणार, याची मला कल्पना होती आणि मी त्याचा मस्त फायदा घेतला” दरम्यान, आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चित्ताकर्षक झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळविला. या विजयासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिकने मोलाची कामगिरी केली. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीत चमकदार खेळ करून भारताला विजय मिळवून दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in