'या' कारणाने भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले

दोन्ही संघ आपलं समाजभान विसरले नाहीत.
'या' कारणाने भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले

आज इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'चा महाअंतिम सामाना खेळला जात आहे. सारेच क्रिकेटप्रेमी या दिवसाची आतूरतेने वाट पाहत होते. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघात हा सामना रंगलेला आहे. सध्याच्या परिस्थितीवरुन सामन्याचा कौल भारताच्या बाजून झूकल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकल्यानंतर देखील प्रथम गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. खरं तर या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्राण पणाला लावून सराव केला आहे. वल्ड कप कोण जिंकणार याचा निर्णय या सामन्याच्या विजयाने लागणार आहे.

नाणेफेकीनंतर अर्ध्यातासाने जेव्हा दोन्ही संघ मैदावर उतरले त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधल्यांचं दिसून आलं. सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त भारतीय नाही तर ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंनी देखील हातावर काळ्या पट्ट्या बांधल्याचं दिसून आलं. दोन्ही संघ आपलं समाजभान विसरले नाहीत. या खेळाडूंनी भारताच्या ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. या अपघातात 300 पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले. तर हजाराहून जास्त लोक जखमी झाले. ही घटना संपुर्ण देशाच्या मनाला चटका लावून गेली. या घटनेतील मृतांना आदरांजली म्हणून भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ या दोन्ही संघातील खेळाडूंनी हातावर काळ्या बांधल्या होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in