स्टेडियमच्या बाहेरील तिकिट विक्रीच्या वेळी झाला गोंधळ

काही महिला रांगेतून पुढे आल्याने तिकीट विक्रीवरून गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे
स्टेडियमच्या बाहेरील तिकिट विक्रीच्या वेळी झाला गोंधळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी १२ जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी बाराबती स्टेडियमच्या बाहेर तिकिटांच्या विक्रीच्या वेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे कटकमध्ये पोलिसांना लाठीमार करावा लागला, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, दोन्ही संघातील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तीन थरांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी कटकमध्ये तिकीट विक्रीदरम्यान चाहत्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही महिला रांगेतून पुढे आल्याने तिकीट विक्रीवरून गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही महिला रांगेच्या पुढे आल्याने तिकीट विक्रीवरून गोंधळ झाला, त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. अतिरिक्त जिल्हा पोलिस आयुक्त प्रमोद रथ म्हणाले की, काउंटरवर १२ हजार तिकिटांसाठी सुमारे ४० हजार लोक आले होते. तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांना या काळात सौम्य बळाचा वापर करावा लागला. ओडिशा क्रिकेट असोसिएशन (ओसीए) ने ऑफलाइन विक्रीसाठी सुमारे १२,००० तिकिटे बाजूला ठेवली होती, जी सर्व विकली गेली, असे त्याचे सचिव संजय बेहरा यांनी सांगितले. बुधवारी रात्रीपासून महिलांसह अनेक लोक रांगेत थांबलेले होते. पाच हजार तिकिटे ऑनलाइन विकली गेली होती आणि आणखी आठ हजार तिकिटे ओडिशा क्रिकेट असोसिएशनशी (ओसीए) संबंधित क्लब, शाळा आणि इतर संस्थांना विकली गेली होती. दरम्यान, पोलीस आयुक्त एसके प्रियदर्शी यांनी सांगितले की, दोन्ही संघातील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तीन थरांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिकिटांच्या विक्रीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्टेडियमभोवती प्रत्येकी ३० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या दहा पलटण पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in