जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या या खेळाडूची अंतिम फेरीत धडक,भारताच्या पदकांच्या आशा पल्लवित

भारतीय लष्करात असलेल्या २७ वर्षीय अविनाशने ८.१८.४४ इतक्या वेळेची नोंद करत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले
 जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या  या खेळाडूची अंतिम फेरीत धडक,भारताच्या पदकांच्या आशा पल्लवित

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत शनिवारी अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे भारताच्या पदकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भारतीय लष्करात असलेल्या २७ वर्षीय अविनाशने ८.१८.४४ इतक्या वेळेची नोंद करत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले. हिट ३मध्ये अविनाशने एक हजार ५०० मीटरपर्यंत अव्वल स्थान कायम ठेवले. त्यानंतर तो मागे पडला आणि सहाव्या क्रमांकावर गेला. अखेरच्या २०० मीटरमध्ये अविनाशने जोरदार मुसंडी मारत तिसरे स्थान मिळविले. मे महिन्यात अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रोनो येथे झालेल्या साउंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये अविनाशने ५ हजार मीटर शर्यतीत ३० वर्ष जुना विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यावेळी अविनाशने बहादूर प्रसादने ३० वर्षांपूर्वी केलेला विक्रम मागे टाकला होता. अविनाशने १३.२५.६५ या वेळेत ५ हजार मीटर हे अंतर पार केले होते आणि त्याला १२ वा क्रमांक मिळाला होता. जून महिन्यात डायमंड लीग मीटमध्ये त्याने तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये आठव्यांदा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने ८ मिनिटे १२.४८ सेकंद इतका वेळ घेतला होता. अविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम गेला होता. तेव्हा अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते. ऑलिम्पिकच्या आधी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही अविनाशने मोठे यश मिळवले होते. स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in