
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत वरचा क्रमांक पटकाविला.
बाबर आणि सूर्यकुमार यांच्यात गेल्या तीन-चार क्रमवारीपासून जोरदार रस्सीखेच होत होती. दोघांमध्ये अवघ्या काही रेटिंग्स पॉइंट्सचे अंतर होते; मात्र सूर्यकुमारने या खेपेला बाबरला मागे टाकण्यात यश मिळविले. सूर्यकुमारला नव्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला. बाबरची अर्थातच एका स्थानाने घसरण झाली. दोघांच्या रेटिंग्स पॉइंट्समध्ये अवघ्या नऊ गुणांचा फरक आहे. सूर्यकुमारच्या नावे ७८०; तर बाबरच्या नावे ७७१ पॉइंट्स आहेत.