दक्षिण आफ्रिकेविरुध्द आज दुसरा वन-डे सामना भारताला विजय आवश्यक

दीपक चहर दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने टीम इंडियाच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुध्द आज दुसरा वन-डे सामना
भारताला विजय आवश्यक

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील दुसरा सामना रविवारी रांची येथे होत असून मालिकेतील आव्हान टिकविण्यासाठीभारताला विजय आवश्यक आहे. भारताला गोलंदाजी सुधारण्यावर विशेष भर द्यावा लागणार आहे.

दीपक चहर दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने टीम इंडियाच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या संघात स्थान मिळविण्यासाठी या वन-डे मालिकेचा खेळाडूंना काहीही उपयोग होणार नसला, तरी अस्तित्त्वासाठी प्रत्येक खेळाडू आपली बाजी पणास लावतील, अशी शक्यता आहे. भारताचा टी-२० विश्वचषक संघ पर्थला पोहोचला आहे. आता या वन-डे मालिकेनंतर राखीव खेळाडूच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतल्याने त्यांचे मनौर्धर्य वाढले आहे. हा सामना भारताने गमावल्यास मालिकेतील भारताचे आव्हानच संपुष्टात येईल. त्यामुळे सामना जिंकण्याचा सर्वतोपरी आटापिटा टीम इंडियाला करावा लागेल.

पहिल्या वन-डे सामन्यात मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांना प्रभाव पाडण्यात अपयश आले. त्यामुळे बंगालचा जलदगती गोलंदाज मुकेश कुमार याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी उपकर्णधार श्रेयस अय्यरला दमदार फलंदाजी करावी लागेल. तो टी-२० विश्वचषक संघातील राखीव फलंदाज असल्याने त्याला आपसुकच सरावही मिळणार आहे.

शॉर्टपिच चेंडूचा सामना करताना त्याला खास खबरदारी घ्यावी लागेल. गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनकडून भारताला पुन्हा सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार शिखर धवनला वेस्टइंडीज आणि श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेप्रमाणेच आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवावी लागेल. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी दमदार सुरुवात करून देण्याची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत :

शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर.

दक्षिण आफ्रिका :

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, जानेमन मालन, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वेन पार्नेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा आणि तबरेज शम्सी.

सामन्याची वेळ :

दुपारी १.३० पासून

थेट प्रक्षेपण :

स्टार स्पोर्ट‌्स नेटवर्क

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in