युवा खेळाडूऐवजी ज्येष्ठ खेळाडूच्या हाती विजयाचा चषक

भारताने एखादी ट्रॉफी जिंकल्यास ती ट्रॉफी संघातील सर्वात युवा खेळाडूकडे देण्याची प्रथा आहे.
युवा खेळाडूऐवजी ज्येष्ठ खेळाडूच्या हाती विजयाचा चषक

भारताने टी-२० मालिकेतील शेवटच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव करत मालिका २-१ ने अशी जिंकल्यांनतर मालिका विजयाची ट्रॉफी स्वीकारून थेट संघातील ज्येष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकच्या हाती दिली. यामुळे अनेकजण अचंबित झाले.

भारताने एखादी ट्रॉफी जिंकल्यास ती ट्रॉफी संघातील सर्वात युवा खेळाडूकडे देण्याची प्रथा आहे. त्यानंतरच संघाचे ट्रॉफीसोबत फोटो सेशन होत असते. परंतु यावेळी युवा खेळाडू ऋषभ पंत एका कोपऱ्यात उभा असलेला दिसला.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८६ धावा केल्या. भारताने एक चेंडू उरलेला असताना चार विकेट‌्सच्या मोबदल्यात १८७ धावा करून सामना जिंकला.

टी-२० मधील २१ वा विजय

रोहितने पूर्णवेळ कर्णधार पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून भारताचा हा नववा विजय ठरला. भारताने या वर्षातील टी-२० मधील २१ वा विजय मिळवत पाकिस्तानचा सर्वाधिक २० विजयांचा विक्रम मोडला..

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in