Virat Kohli accused on Fake Fielding: विराट कोहली चिटर! असे का म्हणतंय बांगलादेश?

पावसाचा व्यत्यय, कार्तिकचा रान आऊट अशा अनेक गोष्टी घडल्या. परंतु, आता एका बांगलादेशच्या खेळाडूने विराट कोहलीला चक्क 'चीटर' म्हणत त्याच्यावर आरोप केले
Virat Kohli accused on Fake Fielding:  विराट कोहली चिटर! असे का म्हणतंय बांगलादेश?

बुधवारी भारताने बांगलादेशवर रोमहर्षक विजय मिळवत आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये जाण्याच्या मार्ग निश्चित केला आहे. हा सामना अनेक अर्थी चर्चेचा विषय ठरला. पावसाचा व्यत्यय, कार्तिकचा रान आऊट अशा अनेक गोष्टी घडल्या. परंतु, आता एका बांगलादेशच्या खेळाडूने विराट कोहलीला चक्क 'चीटर' म्हणत त्याच्यावर आरोप केले आहेत.

नेमका प्रसंग काय?

भारतीय संघाने धावांचा रतीब उभा केल्यानंतर बांगलादेश १८५ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला. सुरुवातीला बांगलादेशने तडाखेबाज फलंदाजीकरत ७ षटकांमध्ये बिनबाद ६८ धावा केल्या. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईस नियमांनुसार १६ षटकांमध्ये १५१ धावांचे लक्ष मिळाले. पण ७व्याच षटकात अर्शदीप सिंगने सीमारेषेवरून चेंडू थ्रो केला आणि तो थेट दिनेश कार्तिककडे आला. पण, या दोघांच्यामध्ये उभा असलेल्या विराटने चेंडू त्याच्याकडे आल्याचा आभास निर्माण करून थ्रो करण्याचा अभिनय केला. विराटची ही कृती पंचांच्या नव्हे तर त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचे लिटन दास व नजमुल शांतो यांचादेखील लक्षात अली नाही. पण, बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसन सोहन याने या गोष्टीवर आक्षेप घेतला.

काय म्हणाला नुरुल हसन?

सामन्यानंतर बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसन सोहन याने सांगितले की, "मैदानावरील पंचांनी विराट कोहलीच्या 'फेक फिल्डिंग'कडे दुर्लक्ष केले. आयसीसीच्या ४१.५ या कायद्यानुसार, चेंडूने जाणूनबुजून फलंदाजाचे लक्ष विचलित केले, फसवले किंवा अडथळा आणला तर त्याला 'डेड बॉल' घोषित केले जाऊ शकते. तसेच, फलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून पाच धावा मिळतील. मैदान ओले होते आणि त्याचा परिणाम सर्वांनी पाहिला. त्या थ्रो बाबत आमची चर्चा झाली होती. त्या थ्रोवर पाच धावा दंड ठोठावले असते तर सामना आमच्या बाजूने गेला असता, पण दुर्दैवाने तसे झाले नाही."

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in