दिनेश कार्तिकमुळे पंतच्या संघाला धोका निर्माण होणार?

दिनेश कार्तिकमुळे पंतच्या संघाला धोका निर्माण होणार?

एका टीव्ही वाहिनीने यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही पंतने रोखठोक मत व्यक्त केले होते.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषक टी-२० स्पर्धेसाठी भारतीय संघात ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन यष्टिरक्षक-फलंदाजांचा समावेश केला आहे. दिनेश कार्तिकमुळे पंतच्या संघाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

एका टीव्ही वाहिनीने यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही पंतने रोखठोक मत व्यक्त केले होते. पंतला विचारण्यात आले की, कार्तिकमुळे संघातील त्याच्या स्थानाला धोका आहे का? यावर पंतने उत्तर दिले की, आम्ही त्याचा विचार करीत नाही. आम्ही वैयक्तिकरीत्या नेहमीच आमचे १०० टक्के योगदान संघाला देऊ इच्छितो. त्याचा फायदा संघ कसा घेतो, ते हे प्रशिक्षक आणि कर्णधारावर यांच्यावर अवलंबून आहे.

भारताने जूनपासून जास्तीत जास्त टी-२० सामन्यांमध्ये कार्तिक आणि पंत या दोघांचा प्लेइंग-११ मध्ये समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत दोघांचा एकत्रित संघात समावेश करण्यात आला होता. पंतला मधल्या फळीतील एक विशेष फलंदाज आणि कार्तिकला अनुभवी फिनिशर म्हणून संघात ठेवण्यात आले होते.

हार्दिक पंड्या तंदुरुस्त झाल्यानंतर आणि विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये परतल्यानंतर संघात अधिक संतुलन निर्माण करण्यासाठी पंत आणि कार्तिक यांना प्लेइंग-११ मध्ये संधी द्यावी, असे क्रिकेट तज्ज्ञांना वाटते.

येत्या १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पंत आणि कार्तिक दोघांचीही निवड झालेली नाही. ते दोघे थेट आशिया चषकामध्ये खेळतील. भारताची पहिली लढत २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in