नगर परिषदेच्या एरंजाड येथील विद्यार्थींनी जगवली ९० झाडे

नगर परिषदेच्या एरंजाड येथील विद्यार्थींनी जगवली ९० झाडे

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या एरंजाड येथील पर्यावरण पूरक शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शाळेच्या परिसरात विविध प्रजातीची ९० झाडे जगविण्यात यश आले आहे.वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, आवळा आदींचा त्यामध्ये समावेश असून याबद्दल या शाळेतील विद्यार्थी,पालक व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

यावर्षीही पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पर्यावरण पूरक शाळा क्र. १५ या शाळेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. नगर परिषद प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी जांभूळ, निलगिरी कडुलिंब ही वृक्ष तसेच कोरफड, चिनी गुलाब इत्यादी रोपांची लागवड एरंजाड शाळेत करण्यात आली.

नगर अभियंता संजय कुंभार, पर्यावरण विभाग प्रमुख लवटे शिक्षण विभाग प्रमुख विलास जडचे, एरंजाह शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश मेहेर, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक इंगळे, शिरगांव आपटेवाडी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शोभा पाटील, इतर शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.जगाच्या अनेक भागात तापमान वाढ होत असून हवामान बदलाचा फटका बसत आहे. एकूणच पर्यावरणात प्राणवायूचा होणारा तुटवडा लक्षात घेता सद्य परिस्थितीत जास्तीत जास्त ऑक्सिजन देणाऱ्या तसेच पर्यावरण स्नेही वृक्षांची लागवड करण्यावर मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने भर दिलेला असल्याचे विलास जडये यांनी सांगितले.वृक्ष संवर्धनाचा वसा प्रत्येकाने हाती घेतला तरच ढासळणाऱ्या पर्यावरणाला आपण वाचवू शकतो, असे सांगून प्रत्येकाने प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नगर अभियंता संजय कुंभार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in