ठाणे पालिकेच्या तिजोरीत कोटी रुपयांची मालमत्ता कर जमा

मालमत्ता कर सवलतीचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा यासाठी १५ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ पर्यत ४% सवलत देण्यात आली
 ठाणे पालिकेच्या तिजोरीत कोटी रुपयांची मालमत्ता कर जमा

ठाणेकर करदात्यांना पहिल्या सहामाही सोबत दुसऱ्या सहामाहीचा सामान्य कर भरणेकरिता प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी १६ जून ते १५ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीचा फायदा ठाणेकरांनी घेतला असून जुलै २०२२ अखेर ३४५ कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. तसेच ही मुदतवाढ दिल्याबद्दल करदात्यांनी आयुक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.

मालमत्ता कर सवलतीचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा यासाठी १५ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ पर्यत ४% सवलत देण्यात आली होती.

या सवलतीस दिलेल्या मुदतवाढीस करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून जुलै २०२२ अखेर ३४५ कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे, या कालावधीत मागील वर्षी २६० कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. यावर्षी मालमत्ता कराकरिता ७७० कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट असून चार महिन्यातच त्यापैकी ४५ टक्के वसुली म्हणजेच ३४५ कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in