कल्याण, भिवंडीतील अवैध बांधकामांना अभय दंड भरून होणार नियमीत


कल्याण, भिवंडीतील अवैध बांधकामांना अभय

दंड भरून होणार नियमीत

एमएमआरडीएकडून दंड निश्चिती

स्वीटी अदिमूलम/मुंबई

भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथील अवैध बांधकामे दंड भरून नियमीत केली जाणार आहेत. एमएमआरडीएकडून विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून प्रिमीयमच्या रुपात दंड भरून ही बांधकामे नियमीत केली जाणार आहेत. मुंबई महापालिकेच्या अवैध बांधकाम वैध करण्याच्या धोरणानुसार याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

एमएमआरडीएने २० ते १०० टक्के प्रिमीयम म्हणून दंडाची रक्कम निश्चीत केली आहे. मूळ प्रिमीयम दराच्या २५ टक्क्यांवर २० टक्के दंड आकारण्यास मान्यता दिली आहे. हे बांधकाम नियमीत करताना जमिनीचे जे मुद्रांक शु्ल्क भरले आहे, त्यावर २५ टक्के मूळ प्रीमीयमचा दर धरला जाणार आहे. विविध नियमांच्या उल्लंघनानुसार वेगवेगळा दंड आकारला जाईल, असे एमएमआरडीएने म्हटले आहे.

दरम्यान, बांधकामे अधिकृत करायची असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव अर्जदारांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सादर करावेत, असे महानगर आयुक्तांनी अधिसूचनेत नमूद केले आहे.

एमएमआरडीएने सांगितले की, भिवंडीत मोठया प्रमाणावर गोदामे आहेत. या गोदामामुळे हजारो जणांना रोजगार मिळतो. त्यामुळे तेथे दंडाची रक्कम कमी आकारावी, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कंपन्यांना त्याची झळ पोहोचणार नाही. मालकांनी पुढे येऊन आपली बांधकामे नियमीत करून घ्यावीत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in