२५ झाेपड्यांवरील कारवाई पुढे ढकलली

 २५ झाेपड्यांवरील कारवाई पुढे ढकलली

डोंबिवली पश्चिमेकडील अण्णानगर झोपडपट्टी डेडीकेटेड फ्रेड कॉरीडोर प्रकल्पात बाधित झाली असून येथे भूसंपादन कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान यामध्ये अपात्र ठरलेल्या २५ झाेपड्यांवर शुक्रवारी बुलडाेझर फिरणार हाेता. मात्र प्रशासनाने ही कारवाई पुढे ढकलली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. येथील पात्र २३० कुटुंबियांना प्रत्येकी १४ लाख रुपये अदा केले आहे. तर उर्वरित २५ अपात्र घरांचेही पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एेन पावसाळ्यात आपला संसार उउघड्यावर पडणार असल्याने चिंतेत असलेल्या या कुटुंबीयांनी महाराष्ट्र रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माणिक उघडे यांच्याकडे धाव घेतली. उघडे यांनी याबाबत सदर प्रकल्पातील रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन कुटुंबीयांचे पुनर्वसन करा, त्यानंतर कारवाई करा, अशी विनंती केली. तर कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे या कुटुंबीयांबाबत माहिती दिली असता त्यांनीही या कुटुंबीयांचे पुर्नवसन केल्यानंतर कारवाई करण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान ही कारवाई पुढे ढकलण्यात आल्याने येथील रहिवाशांना काही काळासाठी तरी दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in