ठाण्यातील लिफ्टच्या डकमध्ये पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातील लिफ्टच्या डकमध्ये पडून वृद्धाचा  दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातील चंदनवाडी येथील रायगड आळीमध्ये असलेल्या जाई इमारतीच्या लिफ्टच्या डकमध्ये पडून नारायण धोंडू बेलोसे (६६) वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने मृतकाला खेचून वर काढले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

नारायण बेलोसे हे बुधवारी अचानक गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान बेलोसे हे बुधवारीच लिफ्टच्या डकमध्ये पडले होते, अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. हा इसम त्या ठिकाणी पडल्याचे कुणाला माहीतच नव्हते. शुक्रवारी या परिसरात दुर्गंधी सुटल्याने केलेल्या तक्रारीनंतर संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टच्या डकमध्ये खाली पडलेल्या बेलोसे यांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. दरम्यान बोलोसे हे लिफ्टच्या डकमध्ये कसे पडले? आणि केव्हा पडले? याचा तपास नौपाडा पोलीस करत आहेत. बुधवारी जेवण झाल्यानंतर बेलोसे हे डकमध्ये पडले होते. हरविल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. अन शुक्रवारी हा प्रकार रात्री उघडकीस आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in