
अनधिकृतपणे खोदकाम करून घेण्यात आलेली नळजोडणींचा शोध घेऊन त्या जोडण्या तोडण्याची मोहीम उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुकर होणार आहे.
आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठा विभागाने अनधिकृत नळजोडणी शोधण्यास सुरवात केली आहे. पाणी टंचाईस कारणीभूत ठरणाऱ्या अशा नळजोडण्या निदर्शनास येताच त्या पोलीस बंदोबस्तात तोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे.
आज कॅम्प नंबर 3 मधील पंजाबी कॉलनीत अनधिकृत नळजोळणी निदर्शनास येताच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या देखरेखीखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अधिकारी विजय मंगतानी, बी.एस.पाटील, दीपक ढोले यांच्या उपस्थितीत ह्या जोडण्या तोडून टाकण्यात आल्या आहेत. यावेळी मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पालिकेच्या कारवाई साठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.