मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा; घेणार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट

मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला जाण्याची तयारी सुरु केली असून पोस्टर्स आणि स्टिकर्स तयार असून शिंदे गटाचे अनेक समर्थक अयोध्येला रवाना होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा; घेणार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट
@ANI

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याची जोरदार तयारी शिंदे गट समर्थकांनी सुरु केली आहे. जाहीर केलेल्या नियोजनानुसार, मुख्यमंत्री शिंदे हे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर या दौऱ्यावर असताना ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटदेखील घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून यासंदर्भातील एक व्हिडियोदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते प्रभू श्रीरामाचे दर्शन, तसेच हनुमान गढीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी ते मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी करून शरयू आरती केल्यानंतर मुंबईसाठी परतणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे कार्यकर्त्ये ८ एप्रिलला अयोध्येकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासाठी खास एक रेल्वेही बुक करण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री शिंदे ९ एप्रिलला अयोध्येत जाणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी अयोध्या दौऱ्याआधी व्हिडियो प्रदर्शित केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in