पावसाळ्यात रानभाज्याच ठरतात आदिवासींचे पालनहार

शेकडो वर्षांची हीच परंपरा आजही मुरबाड तालुक्यातील माळशेजघाटात अखंडपणे सुरू आहे.
पावसाळ्यात रानभाज्याच ठरतात आदिवासींचे पालनहार

इंग्रज कालखंडापासून आदिवासी बांधव तसेच अन्य समाजाचे गोरगरीब शेतकरी कष्टकरी जंगलात निर्माण होणाऱ्या रानमेवा, रानभाज्या, जडीबुटी विविध रोगावरची औषधे जमा करून उन्हाळी पावसाळी दोन्ही सत्रात कुटूंबाचा उरधारनिर्वाह करत असतातत. शेकडो वर्षांची हीच परंपरा आजही मुरबाड तालुक्यातील माळशेजघाटात अखंडपणे सुरू आहे.

लहान मुलांपासून ते वयोवृध्दापर्यंत महिला पुरूष आपल्या कौटुंबिक, शौक्षणिक,आरोग्याच्या गरजा पुर्ण करण्यासाठी रानमेवा, रानभाज्या, जडीबुटी औषधे यांची विक्री करतात. स्वातंत्र्यापुर्वी तसेच स्वातंत्र्याच्या काही काळ सहयाद्रीच्या कुशीत असणाऱ्या न्हाणे घाट, माळशेजघाटापर्यंत रस्ते नव्हते, पर्यटकांची रेलचेल कमी होती. त्यावेळी येथील रानमेवा, रानभाज्या, जडीबुटी औषधे कित्येक अंतर मैल पायी चालून कल्याण मुंबईसारख्या शहराकडे विक्रीस जात असत.

जंगलातील लिंबाचा पाला, पळसाची पाने, फुले, गवताच्या गंज्या, आंब्याची पाने, सागाची पाने, कारवी, रानमाळावरचा छोटा सडपातळ गवत यांना प्रचंड महत्व होते. त्याचसोबत जांभळे, करवंदे, आवळे, आंबा, कैरी, मुहाची फुले यांचा हातभार मोठा होता. विज्ञान प्रयोगाने शेती फळबाग यांच्यात बदल झाला, तसे पर्यटकातही वाढ झाली. परंतु शेकडो वर्षंापासून उन्हाळयातील रानमेवा पावसाळयामधील पालेभाज्या रानभाज्या आजही हजारो पर्यटकांचे समाधान करत आहेत. आता माळशेजघाटाच्या टोकावडापासुन औतुर मढ पुण्याच्या सरहद्दीपर्यंत माळशेजचा रानमेवा, रानभाज्या मिळत आहेत. हजारो पर्यटक आपआपल्या परीने पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

शहरीकरणात अनेकवेळा गटारीच्या पाण्याच्या भाज्या मिळत असल्याची चर्चा होत असते. मात्र गांव खेडयाकडे पिकणाऱ्या भाज्या शुध्द पाण्याच्या म्हणुन मोठया प्रमाणात खरेदी केल्या जातात. अल्पदरात सुध्दा असतात तसेच निर्सगात निर्माण होणाऱ्या रानभाज्या घोळीची भाजी, चवळी, माठ, माठाची भाजी, शेवळी, तेलपट,आळू,फदफदा, भोपुर, टाकल्याची भाजी, मोधुरी कनटोळी अशा अनेक भाज्यांचा आनंद प जुनपासून ते डिसेंबरपर्यंत घेता येत असतो. त्यामुळे पावसाळ्याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे.

रानभाज्याबरोबर आवलं, आळव, भोकर ही फळे पावसाळयात खाण्यास मिळतात. स्वकष्टाने दिवसभर माळशेजघाटाच्या रस्त्यावर पर्यटक प्रवाशांच्या आवडी निवडी पुर्ण करणारे गोरगरीब आदिवासी बांधव आजही बिना बाजारपेठ, बिना शासकीय सुख सुविधांच्या अभावी देखिल आपल्या कुटुंबाचा उधारनिर्वाह मुलांचे शिक्षण करत आहेत.पावसाळयाला सुरूवात झाली असून पर्यटक खवय्यांसाठी दरवर्षी खाण्यासाठी रानभाज्या, मुठे, चिंबोरी, अशा प्रकारची मासे विक्री करणारे आदिवासी मच्छीमार तितकेच उत्साही असतात. मासेमारीसाठी तयार करणारे उपकरणे पागेरे, भुसा, तोंडया यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र रात्रीच्या मोसेमारीसाठी रॉकेल, गॅस बत्तीसाठी किंवा हिंदोळया मिळत नाही यामुळे याचा फटका गोरगरीब

मासेमाऱ्यांना बसत असतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in