
डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय माध्यमातून शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिना निमित्त दोन दिवस मोफत शासकीय दाखले शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या मोफत दाखले शिबिराचे उदघाटन शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख तथा माजी सभागृह नेते राजेश मोरे यांच्या हस्ते शनिवार झाले. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोफत दाखल्यांसाठी गर्दी केली होती. या शिबिरासाठी कल्याण तहसील कार्यालयाने भरीव सहकार्य केले.
शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिना निमित्त मोफत शासकीय दाखले वाटप शिबीर शिवसेना तर्फे शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रीयत्व दाखला, रहिवासी दाखला, जेष्ठ नागरीक दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र आदि दाखले मोफत मिळणार आहेत. यासाठी इच्छुकांनी शिवसेना मध्यवर्ती शहर शाखा मानपाडा रोड, छत्रपती शिवाजी स्मारका शेजारी, डोंबिवली (पू) तेथे १७ ते १८ जून २०२३ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० यावेळेत आवश्यक दाखल्यांसाठी योग्य माहिती भरून अर्ज सादर करायचा असून सोबत अधिकृत कागदपत्रे सोबत द्यायची आहेत. अर्ज भरल्यानंतर त्याची खातरजमा होऊन इच्छुकांना आवश्यक दाखला मिळणार आहे. यामध्ये स्थानिक वास्तव्याचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, उत्पन्नाचा दाखला, जेष्ठ नागरीक दाखला मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर दाखले शिबिरासाठी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी दिपक गायकवाड, तलाठी राजेश दळवी, युवराज पडवळ, गणेश पदीर, मनोज आदमाने, रवींद्र चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले तर या शिबिर यशस्वी होण्यासाठी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय प्रमुख प्रकाश माने, उपकार्यालय प्रमुख सागर बापट, पांडुरंग चव्हाण, संतोष तळाशीकर, ज्ञानेश पवार, जाई ढोले, ऐश्वर्या चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.