एसटी आगारातून जीवघेणा प्रवास; स्ट्रक्चरल ऑडीटनंतर डेपोची इमारत धोकादायक जाहीर

धोकादायक डेपोतून शहापूरच्या ग्रामीण भागातील हजारो प्रवासी आपला जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.
एसटी आगारातून जीवघेणा प्रवास; स्ट्रक्चरल ऑडीटनंतर डेपोची इमारत धोकादायक जाहीर

शहापूर परिवहन महामंडळाचे नवीन अद्यावत एसटी आगाराच्या इमारतीचे कामाबाबात परिवहन बांधकाम विभागाकडून रखडपट्टी सुरू असल्याने या नव्या एसटी डेपोची प्रतिक्षा करीत प्रवाशांना यंदा पुन्हा डेपोच्या इमारतीच्या पावसाळ्यातील गळतीला समोरे जाण्याची वेळ आली आहे.

डेपोची इमारत अतिशय जुनी असल्याने ती जीर्ण झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडीटनंतर ही डेपोची इमारत धोकादायक असल्याचे जाहीर झाले आहे. तरीही अशा धोकादायक डेपोतून शहापूरच्या ग्रामीण भागातील हजारो प्रवासी आपला जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. शहापूर परिवहन डेपोची इमारत ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याने या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले आहे.

कालबाह्य झालेल्या इमारतीचे स्लॅब ढासळू लागले आहेत. डेपोच्या इमारतीच्या बांधकामाचा भार सांभाळणारे लोखंडी पोलही पूर्णपणे गंजून जीर्ण झाल्याने ही इमारत कोसळून डेपोत एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पावसाळ्यात या डेपोच्या इमारतीच्या संपूर्ण छताला प्रचंड गळती लागली आहे. पावसाळ्यातील गळती सुरू झाल्याने डेपोत सर्वत्र पाणीच पाणी जमा होते अणि अशाच परिस्थितीत प्रवशांना बसची वाट पहावी लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे प्रवाशांना डेपोत बसणे तर सोडाच परंतु येथे उभे राहणे देखील कठिण झाले आहे. काही प्रवाशांना तर छत्र्या उघड्या ठेऊन डेपोत उभे राहून बसची वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ठाणे जिल्हयातील शहापूर एसटी आगारात एकूण ५५ बस आहेत यातील ६ बस या लांबपल्यावर धावतात तर काही बस तालुक्यातील ग्रामीण भागात किन्हवली, डोळखांब, चोंढे, शेणवे, टाकिपठार खरांगण, कानवे, आपटे, आस्नोली, तर भिवंडी ,मुरबाड,वाडा,कसारा,या मार्गावर चालविल्या जात आहेत यातून प्रतिदिन रोज तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न हे ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून शहापूर परिवहन महामंडळा मिळते आहे.ग्रामीण भागातील एसटी आगाराची अशीच अवस्था आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in