ठाकुर्लीमधील ९० फीट रोड येथे अचानक एका चारचाकी वाहनाला आग

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही
ठाकुर्लीमधील ९० फीट रोड येथे अचानक एका चारचाकी वाहनाला आग

ठाकुर्लीमधील ९० फीट रोड येथे अचानक एका चारचाकी वाहनाला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आग लागल्याचे दिसताच आजूबाजूच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर काही वेळाने अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांना काही वेळातच आग विझविण्यास यश आले.

शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील चामुंडा उद्यानाजवळ सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
अभिजित खाडे यांनी त्यांची चारचाकी वाहन चामुंडा उद्यानाजवळ पार्क केली होती. सकाळी जिम मधून आल्यावर खाडे हे आपल्या चारचाकी वाहनात बसल्यावर अचानक वाहनात स्पार्क झाला. खाडे यांनी प्रसंगावधान राखून वाहनातून बाहेर पडले. वाहनाला अचानक आग लागल्याचे पाहताच खाडे आणि परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती देताच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. यावेळी शिवसैनिक दीपक भोसले आणि नागरिकांनी अग्निशमक दलाच्या जवानांना मदत केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in