डोंबिवलीमध्ये चक्क रस्ता खचून ट्रक अडकला, मोठा अनर्थ टळला

भिवंडीतील आनगाव येथून जवळपास 7 हजार वीटा घेऊन डोंबिवली येथील ठाकुर्ली पुलावरून मार्गस्थ होणार होता
डोंबिवलीमध्ये चक्क रस्ता खचून ट्रक अडकला, मोठा अनर्थ टळला

बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस डोंबिवली पूर्व येथील स्टेशन रोडवर ड्रेनेजच्या झाकणवर ट्रकचे मागील चाक फसले. ड्रेनेजचे झाकण आतमध्ये फसल्याने हा ट्रक संपूर्ण एका बाजूस पडण्याचा मोठा अनर्थ येथे घडू शकत होता. हा ट्रक भिवंडीतील आनगाव येथून जवळपास 7 हजार वीटा घेऊन डोंबिवली पश्चिम येथील ठाकुर्ली पुलावरून मार्गस्थ होणार होता, मात्र रस्ता चुकल्याने चालक प्रवीण भावर याला नेमका अंदाज न आल्याने सदर प्रकार घडला. या कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी बेरिगेट लावून वाहने इतरत्र वळवली. यानंतर क्रेन लावून फसलेला हा ट्रक रस्त्यातून बाजू करण्यात यश आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in