ठाण्यात मनसेने गांधीगीरी करुन वेगळा आदर्श निर्माण केला

ठाण्यात मनसेने गांधीगीरी करुन वेगळा आदर्श निर्माण केला

मनसे म्हणजे आक्रमकता, मनसेचे आंदोलन म्हणजे भल्याभल्यांना धडकी भरते.मात्र, ठाण्यातील मनसेने रविवारी गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिकांनी स्वतः गटार आणि नालेसफाई हातात घेतली. आणि घोडबंदर परिसरातील तुंबलेल्या गटारांची,नाल्यांची सफाई केली. दोनच दिवसापूर्वी मनसेने शहरातील नाले तीन दिवसात साफ न झाल्यास कचरा महापालिकेत टाकण्याचा इशारा दिला होता. ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी नालेसफाई ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी, शहरातील अनेक नाले अद्यापही तुंबलेलेच आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मनसेने आक्रमक होत गुरुवारी नाल्यात उतरून आंदोलन छेडले होते.तसेच, तीन दिवसात नालेसफाई न झाल्यास कचरा पालिका मुख्यालयात आणुन टाकण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे हा अल्टीमेटम संपण्यापुर्वीच रविवारी मनसेने घोडबंदर रोड परिसरातील तुंबलेल्या नाले व गटारांची स्वतः सफाई केली. यावेळी घोडबंदर येथील गटारे आणि नाल्यातील गाळ व कचरा उपसुन सफाई केली

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in