उल्हासनगरात वाहनचालकाला दोन इसमांनी लुटले

उल्हासनगरात वाहनचालकाला दोन इसमांनी लुटले

पहाटेच्या सुमारास घरी जाणाऱ्या वाहनचालकाला समोर दोन इसमांनी लुटल्याची घटना समाेर आली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीयारुल अन्सार शेख हा अंबरनाथ येथील महालक्ष्मी नगर या ठिकाणी राहणारा तरुण व्यवसायाने वाहन चालक आहे. काल पहाटे तो उल्हासनगर -२ येथील डी टी कलानी कॉलेज जवळील रस्त्याने घरी येत असताना अचानक त्याच्या कार समोर दोन अज्ञात इसमांनी त्यांची रिक्षा आडवी केली. यामुळे शेख याने त्याची कार थांबवली असता हे दोन अज्ञात इसम रिक्षा मधून बाहेर उतरले, त्यातील एकाने शेखच्या गळ्याला चाकू लावला आणि लूटमारीच्या उद्देशाने त्याच्याकडील मोबाइल आणि ८ हजार रुपये रोख रक्कम, बँकेचे एटीएम कार्ड असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. या संदर्भात शेख याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in