
राज्यात विविध पक्षाच्या विद्यार्थी संघटना कार्यरत असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. मात्र ही संघटना अधिक मजबुत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कोकण दौरा सुरु केला आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून आणि समस्या जाणुन घेत आहोत. लवकरच हा दौरा पुर्ण होईल आणि त्यानंतर १ऑगस्टपासुन टप्याटप्याने या विद्यार्थी संघटनेच्या कमिटी स्थापन करण्यात येतील, असे सांगितले.
राज्यात फक्त विद्यार्थी संघटनाच नाही तर, संपुर्ण मनसे यापुढे वाढलेली दिसेल. पक्षाची बांधणी मजबुत करणे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणुन घेऊन नवी नोंदणी करणे, या उद्देशाने हा दौरा सुरू असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. आत्तापर्यंत झालेल्या दौऱ्यात युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कोकणातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष रुपेश पाटील, महीला शहर अध्यक्षा निकिता पाटील, सपना देशमुख, अनिशा गावंड, संदीप ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.